BJGMC Pune class 4 Bharti:
[BJGMC Pune class 4 Bharti:] संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक 15/08/2025 पासून दिनांक 31/08/2025 या कालावधीत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस..या कंपनीमार्फत करण्यात येणार असून अर्ज सादर करण्याबाबतचे अधिकृत संकेतस्थळाबाबतची माहिती https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
Important Dates : महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 15/08/2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31/08/2025
- परीक्षेची तारीख : लवकरच जाहीर होईल
Total Posts : एकूण पदे- 354
Posts Details : पदनिहाय तपशील
क्रमांक | पदाचे नाव | एकूण पदे |
---|---|---|
1 | ग्यास प्लांट ऑपरेटर | 1 |
2 | भांडार सेवक | 1 |
3 | प्रयोगशाळा परिचर | 1 |
4 | दवाखाना सेवक | 4 |
5 | संदेशवाहक | 2 |
6 | बटलर | 4 |
7 | माळी | 3 |
8 | प्रयोगशाळा सेवक | 8 |
9 | स्वयंपाकी सेवक | 8 |
10 | नाभिक | 8 |
11 | सहाय्यक स्वयंपाकी | 9 |
12 | हमाल | 13 |
13 | रुग्णपटवाहक | 10 |
14 | क्ष किरण सेवक | 15 |
15 | शिपाई | 2 |
16 | पहारेकरी | 23 |
17 | चतुर्थ श्रेणी सेवक | 36 |
18 | आया | 38 |
19 | कक्षसेवक | 168 |
एकूण | 354 |
Qualifications : शैक्षणिक पात्रता
- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी )
BJGMC Pune class 4 Bharti- Age Limit : वयोमर्यादा
- किमान वय – 18 वर्ष
- कमाल वय -38 वर्ष
- वयोमर्यादा सवलत –
Exam Fees : परीक्षा शुल्क -
- खुला प्रवर्ग – रु.१०००/-
- राखीव प्रवर्ग – रु.९००/-
Exam Place : परीक्षेचे ठिकाण - पुणे
Important Links : महत्वाच्या लिंक्स
- जाहिरात pdf – सविस्तर जाहिरात डाउनलोड करा
- online अर्ज – येथे क्लिक करा
- अधिकृत वेबसाईट – https://bjgmcpune.com/
- आणखी जाहिराती पहा – https://examgurug.com/
FAQ : वारंवार विचारलेले प्रश्न :
प्र.ही भरती कोणत्या संस्थेमार्फत होत आहे?
उ.ही भरती ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या मार्फत वर्ग -४ (गट-ड) पदांसाठी केली जात आहे.
प्र.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
उ.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ३१/०८/२०२५, रात्री ११:५९ अशी आहे.
प्र.अर्ज कुठे करावा लागेल?
उ.उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://bigmcpcune.com या संकेतस्थळावर सादर करावा.